मंदिरातील दर्शनाची वेळ
श्री सिध्दक्षेत्र श्री ईशान्येश्वर मंदिर सिध्द मंदिर असल्याने मंदिरात पुजेसाठी पुर्ण वेळ पुजारी नेमलेला असुन मंदिरात नित्यनियमाने दररोज दोन वेळेस विधीवत आरती केली जाते. पैकी पहिली आरती सकाळी ७.३० वाजता व दुसरी आरती सांयकाळी ७.३० वाजता केली जाते. दररोज सकाळी ७.३० वाजता आरती झाल्याशिवाय़ मंदिर भाविकांसाठी खुले होत नाही. आरती झाल्यानंतरच प्रत्यक्ष भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले होऊन सांयकाळी ८.०० वाजताची आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद केले जाते. थोडक्यात हे मंदिर सकाळी ८.०० वाजता ते सांयकाळी ८.०० वाजेपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी खुले असुन या काळात खुले राहील.
हे मंदिर सिध्द मंदिर असल्याने येथील काही नियम भाविकांना कठोर वाटतील परंतु हे नियम मंदिराचे पावित्र्य सतत व अखंड टीकविण्यासाठी गरजेचे असल्याने सर्व भाविकांनी मंदिर व्यवस्थापनास सहकार्य करुन आपली काही बाबतीत होणारी गैरसोय सहन करावी असे मंदिर व्यवस्थापन समितीकडुन आवाहन करण्यात येत आहे.
मंदिरचे दैनिक पुजेसाठी व भाविकांच्या अभिषेक पुजेसाठी मंदिर व्यवस्थापन समितीने मंदिरासाठी स्वतंत्र पुजाऱ्याची पुर्णवेळ नेमणुक केलेली असुन ज्या भाविकांस अभिषेक करावयाचा आहे त्यांनी मंदिरात आधिकृत नोंदणी करुन अभिषेक पुजा करण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे. मंदिराचे सोयीसाठी व व्यवस्थापनासाठी अभिषेक पुजा फक्त सकाळी केली जाईल. दुपारी केली जाणार नाही याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी.