वाहतूक व दळणवळण व्यवस्था
श्री सिध्द क्षेत्र श्री ईशान्येश्वर मंदिर मौजे मिरगांव ता.सिन्नर या गावाचे शिवारात असुन हे गाव सिन्नर - शिर्डी राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० वर सिन्नर शहरापासुन पुर्वेस ३५ कि.मी. अंतरावर रस्त्याचे उत्तर बाजुस राज्यमहामार्गापासुन १२०० मीटर अंतरावर आहे. संस्थानाने सिन्नर-शिर्डी महामार्गावर मंदिराचा भव्य असा बोर्ड लावलेला असुन या ठिकाणावर शिर्डी व कोपरगांव येथे जाणाऱ्या व येथुन नाशिक मुंबईकडे जाणाऱ्या अहमदनगर, नाशिक, डहाणु, ठाणे व मुंबई या सर्व विभागाच्या जलद, अतिजलद एस.टी.बस गाडयांना विनंती थांबा मंजुर केलेला आहे.
तसेच हे मंदिर शिर्डी पासुन नाशिक-शिर्डी महामार्गावर अवघे २८ कि.मी. पश्चिमेस असुन शिर्डी येथे रेल्वेने येण्याची देख्रील सुविधा आहे. शिवाय भविष्यात ऑक्टोबर २०१७ मध्ये सुरु होणारे शिर्डी (काकडी) येथील श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ मंदिरापासुन अवघे २० कि.मी. अंतरावर आहे.
श्री ईशान्येश्वर मंदिराचे ठिकाण
श्री सिध्दक्षेत्र श्री ईशान्येश्वर मंदिराचे निश्चित ठिकाण दर्शविणारा नकाशा भाविकांच्या आधिक माहितीसाठी येथे दिला असुन राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० नाशिक, शिर्डी, कोपरगांव व मनमाड रेल्वे स्टेशन दर्शविले असल्याने त्यावरुन भाविकांना मंदिराचे ठिकाणाची सहज माहीती मिळेल