श्री सिद्धपुरुष आदरणीय कॅप्टन श्री अशोककुमार ख्ररात साहेब हे बी.एस्सी. (मॅथ) या शास्र विभागाचे पदवीधर असुन त्यांनी नौकानयन विभागाचे शिक्षण पुर्ण करुन प्रशिक्षणानंतर पहीले ७ वर्ष भारतीय नौकानयन विभागात व नंतरचे १५ वर्ष ऑस्ट्रेलियन व्यापारी नौकानयन विभागात सबमरीन विभागात कॅप्टन या पदावर अतिशय यशस्वीरीत्या एकुण २२ वर्ष सेवा पुर्ण करुन निवृत्त झालेले आहे. या प्रदिर्घ अशा २२ वर्षाच्या नौकानयन विभागातील कॅप्टन पदावर काम करतांना त्यांनी जगातील १५४ देशांचे दौरे पुर्ण केलेले असल्याने या सर्व १५४ देशातील धार्मिक रुढी, परंपरा, संस्कृती, आचार विचार, त्या देशाची प्रगति, मागासलेपणा व नैसर्गिक परीस्थितीबद्दल त्यांचा गाढा अभ्यास असल्याने त्यांचेकडे अनन्यसाधारण अशा अनुभवाची मोठी शिदोरी आहे.
नौकानयन विभागात ऑस्ट्रेलियन मर्चंट नेव्हीत काम करताना नौकानयन सेवेतील अतीमहत्वाचे एक गरजेचे प्रशिक्षण म्हणुन तसेच आदरनिय कॅप्टन साहेब यांचे ब्रम्हांडशास्र विद्येचे गुरु व नौकरीतील नौकानयन विभागाचे प्रमुख व साईनिंग ऑफीसर आदरणीय वैकुंठवासी श्रीमान मुजुमदार साहेब यांचे खास आग्रहाखातर त्यांनी या जगातील कोणतीही परीस्थीती, प्रसंग निसर्ग, मानव व प्राणीमात्र तसेच सजीव निर्जीव वस्तु या सर्वाच्या भुतकाळ व भविष्यकाळाचा शुन्य मिनिटात वेध घेणा-या अतिशय श्रेष्ठ परंतु अतिशय अदभुत अशा शास्राचा त्यांनी अभ्यास पुर्ण केला असुन संपुर्ण जगातील प्रगत राष्ट्रातील हे प्रशिक्षण पुर्ण केले आहे. त्यांना एकुण २७७ विद्यार्थ्यामध्ये या प्रशिक्षणात सुवर्ण पदक मिळालेले असुन घेतलेले प्रशिक्षणातील शास्र म्हणजे ब्रम्हांडशास्र. त्यालाच इंगजीत सिवॉलॉजी अथवा समुद्रशास्र अथवा ओसिनोलॉजी असे म्हणतात.