श्री सिद्ध क्षेत्र श्री ईशान्येश्वर तीर्थक्षेत्र
प्रस्तावना
नासिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील मौजे मिरगाव शिवारात सिन्नर - शिर्डी राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० वर सिन्नर शहरापासुन पुर्वेस ३५ कि.मी. अंतरावर जामनदीच्या तीरावर देवाधिदेव महादेव श्री भगवान शंकराचे श्री सिध्दक्षेत्र श्री ईशान्येश्वर या नावाने पुर्णता हेमाडपंथी स्वरुपाचे २७ मीटर बाय १८ मीटर लांबी रुंदीचे अतिशय भव्य, सुंदर व मोहक अशा श्री सिध्द मंदीराची वास्तु साकारली असुन हे हेमाडपंथी मंदिर पुर्णता धर्मशास्रात सिध्द मंदीराचे संबंधात नमुद असलेल्या सर्व शास्रीय तरतुदीचा उत्तम नमुना आहे. या मंदिरातील मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक १६ ऑगस्ट २०१० रोजी संपन्न होऊन हे सिध्द स्वरुपातील मंदिर सर्व भाविकांना दर्शनासाठी खुले झालेले आहे.
हेमाडपंथी मंदिर म्हणजे झटपट बांधलेले ओबडधोबड मंदिर होय, १३ व्या शतकातील काळ हा हेमाद्री राजाचा काळ, या काळात परकीय आक्रमणामुळे अनेक हिंदु मंदिरे उध्वस्त केली गेली. त्याला प्रतिउत्तर म्हणुन झटपट मंदिरे बांधण्याची पध्दत हेमाद्री राजाने विपुल प्रमाणात वापरली. हेमाद्रीने या मंदीराचे बांधकाम करतांना चुना व शिसे हे बांधकाम साहीत्य न वापरता फक्त दगडाला खोबणी करुन दगड एकमेकांना घट्ट बसविण्याच्या पध्दतीस हेमाडपंथी म्हणण्याची पध्दत तेव्हापासुन रुढ झाली ही पध्दत हेमाद्री राजाने सुरु केल्याने या पध्दतीने बांधलेल्या मंदीरास हेमाडपंथी मंदीर असे म्ह्टले जाऊ लागले.
Read More
नित्य सेवा ईपुस्तिका डाउनलोड करण्यासाठी, खालील लिंक क्लिक करा.
Download EBook