श्री सिद्ध क्षेत्र श्री ईशान्येश्वर मंदिराची माहिती
नासिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील मौजे मिरगाव शिवारात सिन्नर - शिर्डी राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० वर सिन्नर शहरापासुन पुर्वेस ३५ कि.मी. अंतरावर जामनदीच्या तीरावर देवाधिदेव महादेव श्री भगवान शंकराचे श्री सिध्दक्षेत्र श्री ईशान्येश्वर या नावाने पुर्णता हेमाडपंथी स्वरुपाचे २७ मीटर बाय १८ मीटर लांबी रुंदीचे अतिशय भव्य, सुंदर व मोहक अशा श्री सिध्द मंदीराची वास्तु साकारली असुन हे हेमाडपंथी मंदिर पुर्णता धर्मशास्रात सिध्द मंदीराचे संबंधात नमुद असलेल्या सर्व शास्रीय तरतुदीचा उत्तम नमुना आहे. या मंदिरातील मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक १६ ऑगस्ट २०१० रोजी संपन्न होऊन हे सिध्द स्वरुपातील मंदिर सर्व भाविकांना दर्शनासाठी खुले झालेले आहे.
हेमाडपंथी मंदिर म्हणजे झटपट बांधलेले ओबडधोबड मंदिर होय, १३ व्या शतकातील काळ हा हेमाद्री राजाचा काळ, या काळात परकीय आक्रमणामुळे अनेक हिंदु मंदिरे उध्वस्त केली गेली. त्याला प्रतिउत्तर म्हणुन झटपट मंदिरे बांधण्याची पध्दत हेमाद्री राजाने विपुल प्रमाणात वापरली. हेमाद्रीने या मंदीराचे बांधकाम करतांना चुना व शिसे हे बांधकाम साहीत्य न वापरता फक्त दगडाला खोबणी करुन दगड एकमेकांना घट्ट बसविण्याच्या पध्दतीस हेमाडपंथी म्हणण्याची पध्दत तेव्हापासुन रुढ झाली ही पध्दत हेमाद्री राजाने सुरु केल्याने या पध्दतीने बांधलेल्या मंदीरास हेमाडपंथी मंदीर असे म्ह्टले जाऊ लागले.
अशा या श्रीसिध्दक्षेत्र श्री ईशान्येश्वराच्या हेमाडपंथी मंदिराचे निर्माते व सर्वेसर्वा आहेत सिन्नर तालुक्यातील शिवाजीनगर (कहांडळ्वाडी) गावाचे सुपुत्र की ज्यांनी गेली २२ वर्ष अतिशय यशस्वीरीत्या देशातील व परदेशातील व्यापारी नौकानयन विभागात कॅप्टन पदाची जबाबदारी सांभाळलेले सेवा निवृत्त कॅप्टन सिध्दपुरुष श्री अशोककुमार ख्ररात हे होय. हे मंदिर उभारणी करतांना आम्ही मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५८ च्या कायद्यातील तरतुदीनुसार श्री शिवनिका संस्थान, मिरगांव या नावाने न्यासाची प्रथम विधीवत कायदेशिर नोंदनी केली असुन न्यासाचा नोंदणी क्रं-१०८७/नाशिक दि-१३/०८/२००९ असा आहे व या न्यासाचे नोंदणी समयीचे अध्यक्ष आदरणीय सिध्दपुरुष श्री कॅप्टन अशोककुमार एकनाथ ख्ररात, उपाध्यक्ष श्री मनोज शंकरराव गोहाड व सरचिटणीस श्री नामकर्ण यशवंत आवारे व इतर उर्वरीत चार विश्वस्त आहेत श्री सुभाषराव केशवराव गमे, श्री जितेंद्र गणपतराव शेळ्के, श्री राजेंद्र भागवतराव घुमरे व श्री नारायण लक्ष्मण शिंदे असे एकुण सात विश्वस्ताचे कार्यकारी मंडळाने या मंदिराची स्थापना केली.
श्रीसिध्दक्षेत्र श्री ईशान्येश्वर मंदिर ऊभारणी करतांना आम्ही मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५८ च्या कायद्यातील तरतुदींनुसार श्री शिवनिका संस्थान, मिरगांव या नावाने न्यासाची प्रथम विधिवत कायदेशिर नोंदणी केली असुन न्यासाचा नोंदणी क्रं-१०८७/नाशिक. दि-१३/०८/२००९ असा आहे. व या न्यासाचे अध्यक्ष आहेत आदरणीय सिध्दपुरुष श्री कॅप्टन अशोककुमार एकनाथ ख्ररात, उपाध्यक्ष श्री राजेंद्र भागवतराव घुमरे व सरचिटणीस श्री नामकर्ण यशवंत आवारे व इतर उर्वरीत चार विश्वस्त आहेत श्री सुभाषराव केशवराव गमे, श्री जितेंद्र गणपतराव शेळ्के, श्री नितीन संभाजीराव घुमरे व सौ. रुपाली निलेश चाकणकर असे एकुण सात विश्वस्ताचे कार्यकारी मंडळ सध्या कार्यरत आहे.
सिध्द मंदिराचे बांधकाम करताना त्या मंदिराच्या बांधकामात ग्रह, तिथी, नक्षत्र, धर्म, संस्कॄती, सदभावना, पवित्रता, मंदिर परीसरात मयुर व कोल्ह्याचा सतत वावर, मंदिरेच्या ऊत्तरेस नदी, मंदिराच्या २०० मीटर परीघात मानव रहीवास नाही, या सर्वाचा अतितोम संगम व त्यात ठराविक क्षमतेची सिध्दपुजेची जोड असल्याशिवाय कोणतेही सिध्द मंदिर उभारले जाऊच शकत नाही. शिवाय सिध्द पुजा करतांना एकुण मदिर बांधकामास जेवढा कालावधी लागला (एकुण दिवस) त्या कालावधीच्या ३३% टक्के कालावधी (दिवस) वेळेत सिध्द पुजा करुन त्या मंदिरात धार्मिक मंत्राचा प्रभाव,ऊर्जा निर्माण करुन धार्मिक उर्जा निर्माण करावी लागते. जेणेकरुन भविष्यात अशा मंदिरात येणारे सर्व भाविक सुख्री होऊन त्यांच्या सर्वांगीण प्रगतीस या मंदिरातील ऊर्जारुपी भक्तीचा आधार मिळतो. यासाठी कोणीही भाविक आज मंदिरात आल्यास सभामंडपाचे आंत प्रवेश करताक्षणी त्यास अतिशय प्रसन्न अशी ऊर्जा मिळाल्याने तो सुखाऊन जाऊन सर्व दु:ख, चिंता तात्काळ विसरतो व मंदिराबाहेर पडण्याची त्यास इच्छा होत नाही हा अनुभव मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकास सध्या येत आहे. या मंदिराच्या बाबतीत मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकांनी तसा विश्वास व्यक्त करुन नित्यनियमाने विधीवत व पवित्र मनाने पुजा अर्चा केल्यास भाविकाने केलेल्या पुजेची परिणीती भाविकांंच्या योग्यतेनुसार व इच्छेनुसार १०० टक्के मिळणारच याची भविष्यात भाविकांना निश्चित प्रचिती येईल यात शंका नाही.