मिरगाव येथे श्री सिद्ध क्षेत्र श्री ईशान्येश्वर मंदिर बांधण्याचे मूळ कारण व संकल्पना
प्रशिक्षण पुर्ण झाल्याबरोबर आदरनीय कॅप्टन साहेब यांनी त्यांच्या आदरनीय गुरुवर्याचे प्रथम भेटीत त्यांच्या प्रती आदराच्या भावनेने एक संकल्प केला होता की, मी माझ्या आयुष्यात लॉर्ड शिवाचे एकुण ५ सिध्द मंदिराचे बांधकाम करेल व योग्यवेळी त्यापैकी एक भव्य असे सिध्द मंदिर मी माझ्या गांवाच्या परीसरात बांधकाम करुन ते सिध्द मंदिर जनकल्यानार्थ अर्पण करेल. आणि त्या केलेल्या संकल्पाची पुर्ती म्हणजेच श्री शिवनिका संस्थान, मिरगांव या न्यासाच्या वतीने आज मिरगांव शिवारातील जामनदीच्या तीरावर बांधलेले भव्य दिव्य व सिध्द स्वरुपातील श्री ईशान्येश्वराचे मंदिर होय.
श्री सिद्ध क्षेत्र श्री ईशान्येश्वर मंदिराच्या बांधकामात धर्मशास्त्राचा केलेला वापर
श्री सिध्द क्षेत्र. श्री ईशान्येश्वराचे भव्य हेमाडपंथी मंदिर मिरगांव सारख्या आतिशय छोट्या खेडेगावाच्या शिवारात उभारले असुन मंदिराच्या उत्तर बाजुस पश्चिमेकडुन येणारी जामनदी मंदिराच्या जवळ आल्यानंतर ईशान्येवाहीनी होऊन पुढे जाते. नदीकिना-यामुळे मंदिराचा परीसर अतिशय निसर्गरम्य तर झालाच आहे शिवाय़ कोणत्याही नदीच्या दक्षिण किना-यावर सिध्द मंदिर असणे जसे अतिउत्तम तसेच मंदिराची लांबी-रुंदी, जमिनीपासुन उचांवर घेतलेला सभामंडप, चढत जाणाऱ्या पायऱ्यांची संख्या, गाभाऱ्यात उतरणाऱ्या पायऱ्यांची संख्या, एकुण पायऱ्यांची संख्या, मंदिरासाठी ३ प्रवेशद्वारे भव्य अशा गाभा-याची लांबी-रुंदी, भव्य गाभाऱ्याची एकुण उंची, गाभाऱ्या वरील कळ्साची उंची व कळ्साचे एकूण थर मंदिरातील गाभाऱ्याच्या पृष्टभागापासुन कळ्साची एकुण ५१ फुट उंची, दगडी कळसाचे एकुण वजन या बाबत सिध्द मंदिराचे धर्मशास्रात ज्या तरतुदी नमुद आहे त्यांचे तंतोतंत पालन हे मंदिर बांधकाम करतांना सिध्दपुरुष कॅप्टन श्री अशोककुमार ख्ररात साहेब यांनी त्यांचे सिवॉलॉजीच्या माध्यमातुन मिळालेल्या दिव्य ज्ञानातुन केलेले आहे. तसेच सिध्द मंदिराच्या धर्मशास्राप्रमांणे शिव मंदिरातील पिंड (मुर्ती), नंदी कळस व मंदिराच्या बांधकामासाठी लागलेला संपुर्ण दगड हा एकाच जातीचा व एकाच खाणीतील तसेच दगड काम करणारा कारागीर (ठेकेदार) देख्रील सुरवातीपासुन शेवटपर्यंत एकच असणे आवश्यक आहे.
त्याशिवाय सिध्द मंदिराचे बांधकाम सिध्द होऊच शकत नाही. त्याप्रमाणे आम्ही श्री ईशान्येश्वराच्या या हेमाडपंथी मंदिर बांधकामासाठी लागलेला सर्व १००% दगड कोदंड जातीचा असुन तो अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा गावाच्या खाणीतुन घेतला आहे. दगड काढण्यापासुन तर तो दगड बांधकामात बसविणे पर्यंतच्या कामात सुरवातीपासुन शेवटपर्यंत श्रीबजरंग भिमा इरले रा.नेवासा (अहमदनगर) हा एकमेव कारागीर (ठेकेदार) यानेच काम केलेले आहे. तसेच हे सर्व मंदिराचे आराखडे तयार करणेकामी आर्किटेक्ट म्हणुन श्रीसंतोष रामनाथ कपीले, सिन्नर यांनी व मंदिर बांधकामाचे आर.सी.सी. ठेकेदार म्हणुन मे. साई कन्स्ट्रक्शन, सिन्नर प्रोप्रा - श्री संतोष कपीले यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली कामकाज पुर्ण केलेले आहे.